रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 63

  • 3.3k
  • 951

अध्याय 63 रावणाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ उभय सैन्याला उद्देशून रावणाने केलेली श्रीरामांची स्तुती : श्रीरामें रावण जाण । निजबोधबाणेंकरुन ।निवटिंतांचि संपूर्ण । काय दशानन बोलत ॥ १ ॥ऐका गा हे सेनास्थित । नर वानर राक्षस बहुत ।उभय सेनेचे समस्त । माझा वचनार्थ परिसावा ॥ २ ॥ऐकोत देव दानव । यक्ष आणि गंधर्व ।सिद्धचारणादि सर्व । श्रीरामवैभव परिसत ॥ ३ ॥श्रीराम माणूस नव्हे जाण । राम सर्वांतर्यामी पूर्ण ।राम सर्वातीत सनातन । राम चिद्धन चिन्मूर्ति ॥ ४ ॥राम सकळलोककर्ता । राम ब्रह्मादिकां पाळिता ।राम काळाचा आकळिता । सकळांचे माथां श्रीराम ॥ ५ ॥श्रीराम आदिहेतु उत्पत्ती । राम स्थितीची निजस्थिती