रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 66

  • 2.7k
  • 894

अध्याय  66 बिभीषणाला राज्याभिषेक ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जो सकळलोकघातक । सकळधर्मावरोधक ।सत्कर्मविच्छेदक । तो रामें दशमुख निवटिला ॥ १ ॥शेतीं केली वाफधांवणी । जेंवी कृषीवल सुखावे मनीं ।तेंवी निवटून दशाननी । रघुनंदनीं उल्लास ॥ २ ॥दीक्षित याग आचरती । दुःसाध्य यज्ञ संपादिती ।साधोनि केली पूर्णाहुती । पावती विश्रांती निजसुखें ॥ ३ ॥तेंवी रामें करोनि ख्याती । सेतु बांधोनि अपांपती ।राक्षसांची करोनि शांती । लंकापती निवटिला ॥ ४ ॥श्रीराम याज्ञिक चोखत । रणभूमि तेचि यज्ञवाट ।काळानळ अति श्रेष्ठ । हव्यवाट आव्हानिला ॥ ५ ॥सुग्रीवादि हनुमंत । ऋत्विज सेनापति समस्त ।बिभीषण साक्षी तेथ । कर्म सांगत चुकलें तें ॥ ६ ॥परिसमूहन