रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 68

  • 3.3k
  • 1k

अध्याय 68 सीतेचे दिव्य ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ततो वैश्रवणे राजा यमश्च पितृभिः सह ।सहस्त्राक्षश्च देवेशो वरुणश्च जलेश्वरः ॥१॥त्रिशूलपाणिर्विश्वेशो महादेवो वृषध्वजः ।कर्ता सर्वस्य लोकस्य ब्रह्मा च भगवान्प्रभुः ॥२॥स च राजा दशरथो विमानेनांतरिक्षगः ।अभ्याजगाम तं देशं देवराजसमद्युतिः ॥३॥एते सर्वे समागम्य विमानैः सूर्यसंनिभैः ।अभ्यभाषंत काकुत्स्थं मधुरं वाक्यगौरवात ॥४॥ कुबेर, यम, वरुणादि देवांसह दशरथांचे त्या ठिकाणी आगमन : वैश्रवण जो कुबेर । धनवंताचा राजा सधर ।भगवंताचा भांडारघर । तेथें सत्वर पातला ॥ १ ॥अर्यमा पितरसमवेत । यम पातला प्रेतनाथ ।सहस्राक्ष देवनाथ । मरुद्‌गणेंसहित पातला ॥ २ ॥अपांपती अति वोजा । वरुण आला अमृतराजा ।विनवावया रघुराजा । सीताकाजा पैं आले ॥ ३ ॥त्रिशूळपाणी वृषभध्वज