रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 72

  • 3.1k
  • 1k

अध्याय 72 लक्ष्मण – सीतेचे समाधान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ त्रिगुणांची जटा शिरीं । सर्वथा युगाचे सुरासुरीं ।स्वयें त्याची केली बोहरी । भजनेंकरी रामाच्या ॥ ॥लागोनियां भजनवाटा । सोडिला त्रिगुणांचा कुरुठा ।नांवें साचार त्रिजटा । भजननिष्ठा उगवली ॥ २ ॥ऐसी त्रिजटेची ख्याती । चरित्र पावन त्रिजगतीं ।बिभीषणें करोनि विनंती । विमान रघुपती अर्पिलें ॥ ३ ॥तें न घेच रघुनाथ । तेणें बिभीषण सचिंत ।विमाना न शिवे रघुनाथ । भाग्यहत मी करंटा ॥ ४ ॥विमानेंकरोनि तत्वतां । कांहीं सेवा रघुनाथा ।माझी पावेल अल्पता । सकळ वृथा तें झालें ॥ ५ ॥ बाह्म उपचारांनी राम वश होणें नाही : तरीं ऐसें केंवी