रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 73

  • 2.9k
  • 1.1k

अध्याय 73 श्रीरामांचे पुष्पक विमानांत आरोहण – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पुढें ठेवोनि विमान । विश्वकर्मा आणि बिभीषण ।लोटांगण घालोनि पूर्ण । संमुख रघुनंदनु राहिले ॥ १ ॥कर जोडोनिर्यां देख । विमानेंसहित सेवक ।पुढें देखतां रघुकुळटिळक । अनत सुखा पावला ॥ २ ॥ तत्पुष्पकं कामगमं विमानमुपस्थितं प्रेक्ष्य हि दिव्यरूपम् ।गम: प्रहष्ट: सह लहमणेन पुरा यथा वृत्रवथे महेंद्र ॥ १ ॥ श्रीरामांची तेजस्विता : दिव्य तेजांचिया कोटी । अनंतसूर्य कोट्यनुकोटी ।पडतां श्रीरामाची दृष्टी । प्रकाश उठी विमान ॥ ३ ॥दिव्यतेजें देदीप्यमान । लखलखीत अवघें गगन ।देखतांचि रघुनदन । सुखसंपन्न पै झाला ॥ ४ ॥आच्छादोनि निजप्रकाशासी । विमानद्वारा तो प्रकाशी ।स्वयें देखोनि