रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 82

  • 2.7k
  • 957

अध्याय 82 श्रीरामांना राज्याभिषेकाचा निर्णय – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरताची श्रीरामांना प्रार्थना : भेटोनियां सकळांसी । भरत आला रामापासीं ।करोनि साष्टांग नमनासी । लोटांगणेंसीं राम वंदिला ॥ १ ॥बद्धांजलि विनयवृत्ती । भरत सत्यें सत्वमूर्तीं ।विनविता झाला श्रीरघुपती । मधुरोक्तीं नम्रत्वे ॥ २ ॥श्रीरामा तुजवीण । झालों होतों अति दीन ।मृतप्राय कळाहीन । जीवनेंवीण जेंवी धान्य ॥ ३ ॥भ्रतारेंवीण जेंवी कांता । उपहत२ जैसी सर्वथा ।शुंगारभोग सकळ वृथा । तेंवी रघुनाथा तुजवीण ॥ ४ ॥मातृहीन पै बाळक । मृतप्राय दिसे देख ।नाहीं बाळसें कैंचें सुख । स्तनपान निःशेख असेना ॥ ५ ॥तुजवांचोनियां रघुनंदन । तैसी आमची दशा पूर्ण ।केवळ भूमिभार