रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 84

  • 2.5k
  • 879

अध्याय 84 श्रीरामस्वरूपवर्णन – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जयजयाजी श्रीजनार्दना । एकानेका परिपूर्णा ।जनीं असोनि अभिन्ना । अलिप्त जगासी ॥ १ ॥जनीं आहेसी तत्वतां । म्हणोनि तेथें भाव धरितां ।ते तुझी माया गा अच्युता । तेथें सर्वथा तूं नससी ॥ २ ॥जेंवी उदकाचा निखळ फेन । तो केन पितो नवचे तहान ।तेंवी तुजपासून जहाले जन । ते जनां जाणी भेटसी ॥ ३ ॥फेन निरसोनि उदक घेणें । जन निरसोनि तूतें देखणें ।सोनटकाहूनि सोनें पहाणें । अन्यथा शिणणे वायांचि ॥ ४ ॥हे अभेददर्शनहातवटी । तूंचि गुरूचे कृपादृष्टीं ।अवलोकिसी संवसाटी । तै दिठी पैठी तुजमाजी ॥ ५ ॥त्या तुझें स्वरूप चिद्धन ।