रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 88

  • 2.7k
  • 909

अध्याय 88 सर्वांना नैवेद्य-प्रसादाचा लाभ – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताची प्रार्थना : पूर्वप्रसंगी हनुमंतें । विनविलें श्रीरामातें ।सारोनि पारणाविधीतें । प्रसाद आमुतें द्यावा स्वामी ॥ १ ॥सौमित्र आणि भरत । जानकीमातेसमवेत ।पारणे सारोनि निश्चित । करावें तृप्त सकळांसी ॥ २ ॥ब्रह्मादि सुरपंक्ती । प्रसादाची वाट पाहती ।निजसेनेचे सेनापती । आकांक्षिती सुमंतादिक ॥ ३ ॥बिभीषणसुग्रीवादि जाण । अंगद युवराजा आपण ।नळनीळादि कपिगण । प्रसाद पूर्ण वांछिती ॥ ४ ॥जांबवंत सुषेण दधिमुख । श्रीरामप्रसादा सकळिक ।अवघे असती साकांक्ष । त्यांसी आवश्यक सुखावीं ॥ ५ ॥म्हणोनि घातलें लोटांगण । तें देखोनि सकळ जन ।स्वयें झाले सुखैकघन । हनुमंतें विंदान साधिलें ॥ ६