अध्याय 90 बिभीषणाचे लंकेला प्रयाण – ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रामांनी बिभीषणाला लंकेत जाण्यास सांगितले : तदुपरी दुसरे दिवशीं । सारोनिया नित्यकर्मासी ।बैसोनि अंतरसभेसी । बिभीषणासी बोलाविले ॥ १ ॥सीता आणि त्रिवर्गबंधु । उभे राहिले अति स्तब्धु ।मग मांडिला उब्दोधु । बिभीषणालागूनी ॥ २ ॥बिभीषणासी म्हणे श्रीरघुपती । मज कळली तुझी मनोवृत्ती ।आतां असावें अयोध्येप्रती । माझ्या स्नेहा लागोनियां ॥ ३ ॥ वचन पाळण्याची परंपरा : तरी लौकिकीं माझी वार्ता । लंका दिधली शरणागता ।ते हिरोनि सलोभता । बिभीषण अयोध्ये ठेविला ॥ ४ ॥तरी हें थोर जधन्य । सूर्यवंशा येईन ऊन ।स्वगी हरिश्चंद्रादि आपण । अधःपतन पावतील ॥ ५ ॥म्हणोनि