रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 1

  • 3.5k
  • 927

उत्तरकांड अध्याय 1 हनुमंताला स्त्रीराज्याला पाठविणे ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सद्‌गुरूमहिमा : ॐ नमो सद् गुरो जनार्दना । जनीं वनीं समान परिपूर्णा ।सच्चिदानंदा चिद्धना । सेव्य सज्जनां सुरवर्या ॥१॥तूतें गुरूत्वें वंदूं जाता । तंव जनीं वनीं देखें तद्रूपता ।कार्यकारणकर्तृत्वता । तेही तत्वतां न देखें ॥२॥ऐसें निजस्वरूप अगाध । शंकले उपनिषदादि वेद ।शेष श्रमला करिता वाद । शास्त्रानुवाद खुंटला ॥३॥परादि वाचा चारी । शिणोनि थोकल्या दुरी ।तेथें मंदमति नरीं । कवणे परी वर्णावें ॥ ४॥तुझ्या स्वरूपा नाहीं अंत । अनंत म्हणतां मति भीत ।द्वैतस्थानीं मुख्य अद्वैत । बोल बोलत सज्ञान ॥ ५॥जैसें धर्म करितां जनीं । प्रतिष्ठेच्या पारडां बैसोनी ।परलोक पावावा