रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 2

  • 2.5k
  • 783

अध्याय 2 पुलस्त्यांचे आख्यान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भद्रासनीं दशरथकुमर । बैसलासे करूणाकर ।दक्षिणे शेषावतार । वामे भरतशत्रुघ्न ॥१॥कुळगुरू वसिष्ठ सन्मुख । परिवेष्टित प्रधान लोक ।चर्चा करिती धर्मकर्मादिक । तर्कवितर्क बोलती ॥२॥एक सांगती पुराण । एक करिता रामकीर्तन ।एक करिती गायन । होऊन लीन स्वात्मपदीं ॥३॥एक पढती चतुर्वेद । एक म्हणती प्रबंध ।एक करिती विवाद । गद्यपद्य शास्त्रांचे ॥४॥ऐसी सभा प्रसन्नवदन । देखोनि वंदिती बंदिजन ।एक म्हणती हा रघुनंदन । ब्रह्मीं जीवन मूर्तिमंत ॥५॥एक म्हणती हा रघुनंदन । अवतार धरावया एक कारण ।एक म्हाणती धरा भारें पीडोन । श्रीरामा शरण गेली ते ॥६॥तिचिया कैवारा राघव । सगुण होवोनि सावयव ।मारोनियां