रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 3

  • 2.6k
  • 849

अध्याय 3 विश्रव्याची कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ विश्रव्याची तपःसाधना : मग तो पुलस्त्यनंदन । विराम परम पावन ।तेजें जैसा सहस्त्रकिरण । धर्मपरायण पवित्र ॥१॥कर्माचरणीं अति प्रसन्न । चहूं वेदांचे अध्ययन ।शास्त्रांविषयीं महाप्रवीण । भगवद्भजन अहर्निशीं ॥२॥शांति दया सुशीळव्रत । गुरूसेवेसी रतचिता ।परोपकारीं वेची जीवीत । पितृभक्त अतिशयें ॥३॥सर्वभूतीं समता देखे । साधुजनां आत्मवें ओळखे ।पराचा गुण दोष न देखे । ऐसा सुखें तो असे ॥४॥अष्टांगयोग साधूनी । प्राणापान जिणोनीं ।मुद्रा खेच्री अगोचरी तिन्ही । लघूनी ब्रह्मस्थानीं पावला ॥५॥ऐसा योगनिष्ठ तपोनिष्ठ धर्मनिष्ठ ऋषी । आचरे आश्रमविहित कर्मासी ।नुल्लंघी मातृपितृवचनासी । द्वेष तयासीं असेना ॥६॥ त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भरद्वाजाने आपली