रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 8

  • 1.3k
  • 375

अध्याय 8 भीतीने राक्षसांचे पातालगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अवनिजापति रघुनंदन । जोडून पाणी करी प्रश्न ।अग्स्ति तुझेनि मुखें आपण । माळीमरण आयकिलें ॥१॥पुढें उरले दोघे बंधु । त्यांचा कैसा जाहला वधु ।त्यांतें वधिता गोविंदु । किंवा आणिक पैं असे ॥२॥अगस्ति म्हण श्रीरघुपती । तयां राक्षसां मृत्यु विष्णुहातीं ।विष्णुहातें ते मरती । आणिकाप्रती नाटोपती ॥३॥माळी मारिला ऐकोन । राक्षस मोडले देखोन ।माल्यवंत क्रोधायमान । गिरा गर्जोन चालिला ॥४॥अग्निकुंडासारिखे नेत्र । रागें धनुष्या गुण चढवित ।जैसा समुद्र वेळी लंघित । तैसा धांवत राक्षस ॥५॥ माल्यवंताकडून विष्णूंचा उपहास : दूरी देखोनि विष्णूसी । रागें फोडी आरोळीसी ।जेवीं कां मेघ आकाशीं । वर्षाकाळीं