रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 9

  • 2.3k
  • 744

अध्याय 9 रावण – कुंभकर्णादिंची उत्पत्ती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम म्हणे मुनिवरा । माल्यवंत सुमाळी पाताळविवरा ।प्रवेशले तयावरी चतुरा । कथा पुढारां सांगावी ॥१॥अगस्ति विनवी श्रीरामा । तूं अंतर्यामी साक्षी आम्हां ।ऐसें असोनि हा महिमा । आमचा थोर वाढविसी ॥२॥पुढें ते रजनीचर । पाताळीं प्रवेशले सहपरिवार ।लपोनि राहिले धाक थोर । भय दुस्तर देवांचें ॥३॥कोणे एके समयीं । राक्षस विचरती महीं ।रसातळमृत्यु लोकीं पाहीं । स्व इच्छेनें हिंडती ॥४॥अंगकांति अति सुंदर । शोभा शोभे शशिचक्र ।सुवर्णकुंडलें मकराकार । विशाल नेत्र आकर्ण ॥५॥ऐसा सुमाळी राक्षस । मही विचरत सावकाश ।तंव एके समयीं कुबेरास । देखता झाला दुरोनी ॥६॥कुबेर पुष्पकविमानीं ।