रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 10

  • 1.4k
  • 345

अध्याय 10 रावणाला ब्रह्मदेवाचे वरदान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचा प्रश्न : तदनंतरें अयोध्यापती । ऐकोनि रावणकुंभकर्ण उत्पत्ती ।अत्यंत सुखावोनि चित्तीं । मुनीप्रती पुसता झाला ॥१॥ऐकें स्वामी अगस्तिमुनी । तुवां समुद्र प्राशिला आचमनीं ।दंडकारण्य वसे तुझेनी । विंध्याद्रि धरणी निजविला ॥२॥वातापी इल्वल महाराक्षस । मारोनि ऋषी केलें ससंतोष ।ऐसे तुझे उपकार बहुवस । तूं महापुरूष ईश्वरु ॥३॥कृपा करोनि मज दीनावरी । कथा सांगावी पुढारीं ।गोकर्णाश्रमीं रावण घटश्रोत्री । काय करिते पैं झाले ॥४॥कोण तप तयांचे फळलें । काय नेम करिते झाले ।कोण व्रत आचरले । कैसेनि पावले ऐश्वर्या ॥५॥आधींच कथा रामायण । त्यावरी तुमच्या मुखें निरुपण ।आजि शवणाचें भाग्य गहन