रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 12

  • 2.8k
  • 882

अध्याय 12 रावणादिकांचा विवाह व इंद्रजिताचा जन्म ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ शूर्पणखा – विद्युज्जिव्ह यांचा विवाह : तिघां बंधूंसमवेत । दशग्रीवा लंकाराज्य प्राप्त ।नांदत असतां सुखस्वस्थ । पुढील कथार्थ अवधारा ॥१॥तदनंतरें शूर्पणखा भगिनी । देखिली यौवनेंकरोनी ।रावणासि चिंता मनीं । हे कोणास पैं द्यावी ॥२॥ते शूर्पणखा कैसी । सुपासारिखीं नखें जीसी ।म्हणोनि शूर्पणखा नांव तियेसी । श्रीरामा ऐसी जाणिजे ॥३॥दनूपासूनि संभव । यालागीं तो दानव ।विद्युज्जिव्ह ऐसें नांव । रावण तयाअ भगिनी देता झाला ॥३॥जेंवी विद्यल्लता अंबरीं । तैसी जिव्हा मुखाबाहेरी ।म्हणोनि विद्युज्जिव्ह नामाधिकारी । महाभयंकर दानव ॥५॥विधिपूर्वक कन्यादानासीं । शूर्पणखा दिधली त्यासी ।दशग्रीव आपण पारधीसी । मृगें मारावयासी हिंडता