रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 19

  • 2.6k
  • 864

अध्याय 19 अनरण्य स्वर्गात गेला ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पृथ्वीवरील अनेक राजांकडून अजिंक्यपत्रेस्वीकारीत रावण विजयोन्मादाने अयोध्येस आला : मागील प्रसंग संपतेअंतीं । मरुत्ताते जिंकोन लंकापती ।पुढें येतां अनेक भूपती । पृथ्वीचे जिंतित ॥१॥दृष्टात्मा तो रावण । जिंतित निघाला आपण ।इंद्रासारिखी जयांची आंगवण । तयां रायांप्रति येता झाला ॥२॥रावण क्रोधें म्हणे तयांसी । मी मागतों संग्रामासी ।जरी बळ असेल तुम्हांसी । तरी युद्धासी पैं यावें ॥३॥नाहीं तरी पराभविलें म्हणोन । वदावें मजप्रति वचन ।वृथा बोलाल गा झणें । सुटका नाहीं तुम्हांसी ॥४॥लंकेश्वराचें ऐकोनि वचन । राजे मनांत जाणोन ।म्हणती यासी सदाशिव प्रसन्न । दिधलें वरदान जिंतावे ना ॥५॥ऐसा करोनि विचार ।