अध्याय 24 नारदांचे यमपुरीला आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाला नारदाचे दर्शन : गत कथा झाली ऐसी । जे कां कलिकमल्ष नाशी ।तदनंतरें विचारतां नारदासीं । राक्षसेश्वरें देखिलें ॥१॥नारद जातां गगनीं । रावणें देखिला दुरोनी ।म्हणे देवऋषि कृपा करुनी । नावेक येथवरी येइजे ॥२॥म्हणोनि केलें नमन । दोन्ही कर जोडोन ।स्वामी क्षेम कुशळ कल्याण । हें तुम्हांस पुसणें न लगे ॥३॥तुमचेनि भूतमात्र प्राणी । स्वानंदें वर्तती निजस्थानीं ।तुम्हीं विचंरां परोपकारालागोनी । तुमच्या दर्शनीं मी धन्य ॥४॥ऐकोनि विबुधारिजनकाचें वचन । मग बोले नारद भगवान ।म्हणे राया तुझें वैभव देखोन । आनंदें पूर्ण निवालों ॥५॥ नारदांकडून रावणाची स्तुती : तुज पुष्पकासारिखें विमान