रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 28

  • 1.1k
  • 273

अध्याय 28 शूर्पणखेचे दंडकारण्यात गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दाशरथि वीरचूडमणी । कथा पुसे कुंभोद्भवालागूनी ।म्हणे वरुणपुत्रातें जिंतोनी । रावणें पुढें काय केलें ॥१॥अगस्ति म्हणे वीरशार्दूळा । जमकमाता अयोध्याभूपाळा ।पूर्णब्रह्म अवतारखेळा । खेळतोसी नटनाट्यें ॥२॥निर्विकल्प ब्रह्म तूं सनातन । विरंचि हा तुझा नंदन ।जयानें सृष्टि केली निर्माण । ब्रह्मसृष्टि जाण म्हणिजे ते ॥३॥तुझी आज्ञा वंदी कळिकाळ । तुझी माया हे लोकां सबळ ।तो तूं आम्हाप्रति कुशळ । कथा ऐकों इच्छिसी ॥४॥तरी ऐकें गा श्रीरामचंद्रा । निर्गुणा जी गुणसमुद्रा ।तुझिये आज्ञेनें नरेंद्रा । वाचा चारी वदती शब्द ॥५॥ रावणाकडून वरुणस्त्रियांचें अपहरण : पुढें त्या पौलस्तिनंदनें । वरुणलोक जिंतोनि तेणें ।महावीर मारोनि