रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 29

  • 1.2k
  • 255

अध्याय 29 मधुदैत्य व रावणाची भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ राक्षसाधीश रावण । खरदूषणांसह जनस्थान ।जें घोर अति दारुण । शूर्पणखेलागून दिधलें ॥१॥मग पाहतांचि निजमंदिर । प्रवेशला दशशिर ।कनकप्रभा तेज अपार । रत्नवैदुर्य खांबोखांबीं ॥२॥सुवर्णभित्ती अति कुसरी । चित्रें लिहिलीं नानापरी ।माजि देवांगने सारिखी मंदोदरी । देखोन सुख पावला ॥३॥देवकन्या गंधर्वकन्या जिच्या दासी । अष्टनायिका लाजती देखोनि रुपासी ।ऐसी मंदोदरी देखोनि मानसीं । रावण सुखासी पावला ॥४॥कनकाचिया मंचकावरी । शेज रचली सुमनेंकरीं ।विंजणा वीजती एकी नारी । एकी विडिया पैं देती ॥५॥एकी चरण प्रक्षाळिती । एकी संवाहन करिती ।एकी अंगी चंदन चर्चिती । एकी दाविती दर्पण ॥६॥ऐसें मयासुराचें दुहितारत्न ।