रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 31

  • 1.3k
  • 270

अध्याय 31 सुमाळीचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचे अमरावतीला आगमन : निशी क्रमितां कैलासीं । रंभासंयोगें शाप रावणासी ।देवोनि नलकुबरें त्यासी । पुढें कथा कैसी वर्तली ॥१॥राक्षसें सांडोनि कैलास । ससैन्य सपुत्रबंधु स्वर्गास ।चालिला मार्गी अमरपुरास । ठाकोनि आला ते वेळीं ॥२॥येवोनि अमरपुरा बाहेरी । राक्षस गर्जना करिती थोरी ।घोष ऐकोनि वृत्रारी । कंपायमान पैं झाला ॥३॥ इंद्राने चतुरंग सैन्य सिद्ध केले : आला ऐकोनि रावण । इंद्र झाला चलितासन ।बोले देवांप्रति आपण । सिद्ध सैन्य करा वेगीं ॥४॥आदित्य बारा वसु आठ । अकरा रुद्र व्हावे एकवट ।सिद्ध विश्वदेव मरुग्दण सगट । करा उद्धट युद्धातें ॥५॥सन्नद्ध करा सैन्यसंपत्ती ।