रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 32

  • 2.6k
  • 684

अध्याय 32 इंद्र रावण युद्धाला प्रारंभ ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजिताचे युद्धार्थ आगमन : सवित्रवसूनें सुमाळी । मारिलासे रणकल्लोळीं ।अस्थिमासांची झाली होळी । मेळविला धुळी राक्षसांहित ॥१॥ऐकोनि रावणाचा ज्येष्ठ सुत । क्रोधा चढलासे बहुत ।नेत्र करोनि आरक्त । युद्धा प्रवर्तत ते समसीं ॥२॥पळत्या देवोनि नाभीकार । आपण रणांगणीं राहिला स्थिर ।कनकरथीं जडित धुर । पोंवळ्यांचीं चाकें हो ॥३॥रथीं जुंपिलें वारू । पवनातें म्हणती स्थिरू ।स्वइच्छेनें चराचरू । चरणातळीं दडपिती ॥४॥आधींच ते श्यामकर्ण । पाखरिले भूषणेंकरून ।पताकीं झाकोळलें गगन । तेजें लोपोन जाय हो ॥५॥ऐसिया कनकदिव्यरथीं । आरुढला सुलोचनापती ।दिव्य शस्त्रें घेवोनि हातीं । गर्जना करित निघाला ॥६॥ऐसा देखोनि रिपुकुमर ।