अध्याय 35 हनुमंताचा प्रताप ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ मागिले प्रसंगी शक्रजितें । मैत्री करोनि सोडिलें इंद्रातें ।तदनंतरे सीताकांतें । अगस्तीतें विनविलें ॥१॥श्रीराम दोनी कर जोडून । अगस्तीस विनवी नम्र होऊन ।म्हणे स्वामी वाळिरावणांचे बळासमान । भूमंडळीं आन असेना ॥२॥या दोघांच्या बळाहूनि अधिक । वायुपुत्र असे देख ।तयाचा पराक्रम सम्यक । जम ठाऊक असे जी ॥३॥ श्रीरामांची मारुतीबद्दलची कृतज्ञता : हनुमंताच्या प्रसादेंकरून । प्राप्र्त लंका सीता लक्ष्मण ।येणें सुग्रीवेंसी सख्य जाण । अगणित बळ पैं याचें ॥४॥शुद्धीस जातां सहित वानरेंसीं । समुद्र देखोनि कपि चिंतातुर मानसीं ।तो शत योजनें येणॆं पराक्रमेंसीं । उतरोनि लंका पावला ॥५॥सीतेसी करोनि एकांत । व्न उपडोनि