रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 36

  • 2.5k
  • 723

अध्याय 36 हनुमंताला वरदान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्राणनिरोधामुळे सर्वांना पीडा : समस्तदेवऋषिपंक्ती । प्राणरोधें तळमळती ।येवोनि प्रार्थिला प्रजापती । देव विनंती करिते झाले ॥१॥प्राणनिरोधाचे कष्ट । ऋषी सांगती श्रेष्ठ श्रेष्ठ ।तंव ब्रह्मयाचें फ़ुगलें पोट । अति संकट देवांसी ॥२॥गगनीं लागलें पोट । बोल बोलतां होती कश्त्ःअ ।मळमूत्रा तेथें कैंची वाट । अति संकट देवांसी ॥३॥ब्रह्मा स्वयें सांगे समस्तां । इंद्रे हाणोनि वज्राघाता ।मुर्च्छित पाडिलें हनुमंता वायु पुत्रार्था क्षौभला ॥४॥राहूचे कैवारें अमरनाथें । वज्र हाणिलें वायुसुतातें ।पुत्र पडताचि चाळिता वायु । तो तंव जगाचा जगदायु ।पुत्रलोभें क्षोभोन बहु । भूतां आकांत मांडिला ॥६॥ प्राणवायूचे महत्त्व : प्राणपानीं नित्य सुख ।