रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 42

  • 2.9k
  • 891

अध्याय 42 अशोकवाटिकेचे वर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ गतकथा झाली ऐसी । जे राजे जावोनि स्वदेशासी ।मागें श्रीराम बंधूसहपरिवारेंसीं । राज्य करित अयोध्ये ॥१॥भरतें करोनियां स्तवन । संतोषला रघुनंदन ।देवोनि क्षेम आलिंगन । दोघे सुखसंपन्न पैं असती ॥२॥तयाउपरी जनकजामात । जानकीसहित सुखें वर्तत ।इच्छा उपजली वनवाटिकेंत । सीतायुक्त क्रीडा करणें ॥३॥धरणिजेसहवर्तमान । राजीवनेत्र श्रीरघुनंदन ।तयाचें करावया वर्णन । मी अपुरतें दीन काय वर्णू ॥४॥ अशोकवनाचे वर्णन : अत्यंत सुंदर तें वन । क्रीडा करावया वाटिके जाण ।सेवकांसहित श्रीरघुनंदन । येता झाला वनातें ॥५॥तया वनीं वृक्ष जाती । नानापरींच्या अनुपम्य असती ।तितुक्या सांगतां विस्ताराप्रती । कथा निगुतीं जाईल ॥६॥तरी सांगों संकळित