रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 43

  • 1.4k
  • 501

अध्याय 43 श्रीराम-भद्र-संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तत्रौपविष्टं राजानमुपासंते विचक्षणाः ।कथयतः कथा नानाहास्यकाराः समंततः ॥१॥विजयो मधुमंतश्च कश्यपो मंगलाकुलः ।पुराजित्कालियो भद्रो दंतवक्त्रः सिमागधः ॥२॥एते कथा बहुविधाः परिहाससन्विताः ॥३॥ भद्रासनीं चापशरपाणी । तेथें बैसलें संत चतुर ज्ञानी ।पंडित ऋषी महामुनी । श्रीरामातें उपासिती ॥१॥नानापरींच्या कथा पुराणें । धर्मचर्चा हरिकीर्तनें ।विनोद हास्य गीत गायनें । सकळ मिळोन तेथें करिती ॥२॥कोण कोण ते सभेप्रती । श्रीरामसन्निध तेथें असती ।तयांची नामें संकळितीं । यथानिगुतीं सांगेन ॥३॥विजयो दुसरा मधुमंत । कश्यप मंगळ चौथा तेथ ।पुराजित् काळियो दंतवक्त्र । भद्र जाण आठवा ॥४॥नवमाचें सुमागध नाम । हे नवविध सभानायक परम ।यांचा विश्वास मानी श्रीराम । अति चतुर