रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 44

  • 2.8k
  • 1k

अध्याय 44 श्रीरामांची बंधूंशी भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरत,शत्रुघ्न व लक्ष्मणांना बोलावून आणण्याची रामांची आज्ञा : विसर्जून सभेचे जन । बुद्धिनिश्चित श्रीरघुनंदन ।समीप द्वारपाळासी जाण । आज्ञा करिता पैं झाला ॥१॥अगा द्वारपाळा सज्ञाना । लक्ष्मणभरतशत्रुघ्नां ।वेगीं पाचारीं मम दर्शना । कार्याकारण पैं असे ॥२॥येरे प्राणिपात करोनि स्वामीसी । निघाला सौमित्रभवनासी ।मार्गीं न करोनि वलंबासी । अति त्वरेंसीं चालिला ॥३॥ दूताच्या सांगण्यावरुन तिघेही रामभेटीसाठी निघाले : वेगीं प्रवेशला सौमित्रमंदिरी । तंव संमुख लक्ष्मण ते अवसरीं ।देखोनियां जोडले करीं । नमस्कार पैं केला ॥४॥तुमचिया भेटीकारणें । बोलावूं पाठविलें रघुनंदनें ।ऐसें ऐकतां लक्ष्मणें । रथारुढ पैं झाला ॥५॥रत्नजडित स्यंदनावरी । आरुढोनि सौमित्र