रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 45

  • 2.3k
  • 768

अध्याय 45 श्रीराम व बंधूंचा विचारविनिमय ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ समीप करोनि तिघे बंधु । तयांप्रति बोले कृपासिंधु ।मुख कोमाइलें नयनीं बिंदु । अंबकाचे पडताती ॥१॥अंग चळचळां कांपत । आकुळ व्याकुळ होय चित्त ।बोलता तोंड कोरडें पडत । अवस्था आकळित राघवा ॥२॥अंतरीं राम चैतन्यघन । बाह्य चिंतातुर दीन ।अंतरीं राम सुखसंपन्न । बाह्य उद्वेगें मन व्यापिलें दिसे ॥३॥अंतरीं राम नैराश्य । बाह्य दाखवी आशापाश ।अंतरीं श्रीराम सर्वज्ञ परेश । बाह्य विचार पुसतसे ॥४॥अंतरीं श्रीराम सुखसागरु । बाह्य दिसे व्यवहारी अति चतुरु ।अंतरीं श्रीराम सद्गुरू । बाह्य नरावतारू भासत ॥५॥ऐसा श्रीराम लीलाविग्रही । नानावतार धरी पैं देहीं ।देहबुद्धि तया नाहीं ।