अध्याय 51 लक्ष्मण-सुमंत-संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ तदनंतर सारथि सुमंत । सौमित्राप्रति ऋषिभाषित ।सांगता झाला आनंदित । जें ऐकिलें पूर्वी होतें ॥१॥ दुर्वासांचे दशरथाकडे आगमन : पूर्वी दुर्वास महाऋषी । अत्रिपुत्र अनसूयेच्या कुसीं ।जन्म पावला तपःसामर्थ्येसीं । तो दशरथभेटीसी अयोध्ये आला ॥२॥राजा वसिष्ठ सामोरे गेले । अति सन्मानें दुर्वासा आणिलें ।अर्घ्यपाद्यादिकीं पूजन केलें । भोजन झालें तयावरी ॥३॥वसिष्ठाचा आश्रम पुनीत । तेथें ऋषी वसावयार्थ ।ठाव दिधला हर्षयुक्त । मुनींसमीप राहविला ॥४॥जो दुर्वास महामुनी । तापसांमाजि शिरोमणी ।जयाच्या शापें शाड्.र्गपाणी । निजस्त्रियेसीं दुरावला ॥५॥ऐसा तो दुर्वास ऋषी । वसिष्ठाश्रमीं एक वर्षीं ।राहिला असतां दशरथ सूर्यवंशी । वसिष्ठगृहासि पैं आला ॥६॥श्रीगुरूसी नमस्कार