रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 52

  • 2.7k
  • 849

अध्याय 52 हनुमंत नंदिग्रामास गेला ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रभाते उठोनि सौमित्र । समवेत सुमंत सारथी ।रथासहित अयोध्येप्रती । दीन वदन होवोनि आले ॥१॥भद्रासनीं जनकजामात । प्रधानलोक परिवेष्टित ।कैसी सभा दिसे तेथ । हृष्ट पुष्ट जनेंसीं ॥२॥ दुःखित लक्ष्मणाने घडलेला वृत्तांत रामांना निवेदन केला : सौमित्र होवोनि परम दीन । मुख कोमाइलें कळाहीन ।श्रीरामसमीप येवोन । साष्टांग नमन पैं केलें ॥३॥नेत्रीं अश्रूंचिया धारा । अंग कांपतसे थराथरां ।अधोमुख होवोनि श्रीरामचंद्रा । सर्व वृत्तांत जाणविला ॥४॥स्वामीची आज्ञा घेऊन । प्रवेशलों तिघे जण ।गंगातीरीं जानकी विसर्जून । पुढील कथन अवधारा ॥५॥गंगेच्या पैलतीरीं । दुःखित सीता सांडोनी दुरी ।आम्ही उतरलों ऐलतीरीं । मग