रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 54

  • 1.3k
  • 399

अध्याय 54 नृगराजाचे शापसमयीचे वर्तन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऐसा पवित्र आणि परिकर । रामायणी कथा सार ।एकैक श्रवणीं पडतां उत्तर । भवदोषां वेगळें होईजे ॥१॥ऐसें श्रीरामाचें चरित्र । धन्य गाती तयांचें वक्त्र ।धन्य ऐकोनि घेती त्यांचे श्रोत्र । परम पवित्र ते नर ॥२॥श्रीराममुखींची ऐकोनि कथा । बोलता झाला जाहला शक्रारिहंता ।पुढें नृगरायाची समूळ कथा । ते मजप्रति सांगिजे ॥३॥श्रीराम म्हणे लक्ष्मणा । पुढें नृगरायाचे आख्याना ।मी सांगतों सावधान । श्रवणीं अवधारिजे ॥४॥येरीकडे नृगराजभूपती । जाणोनि ब्राह्मणाची शापोक्ती ।थोर दुःखी झाला चित्तीं । ब्राह्मणाप्रती न चले कांहीं ॥५॥मंत्री पुरोहित नगरजन । थोर थोर बोलवोनि ब्राह्मण ।शिल्पकार गृहकर्ते जाण । तेथें