रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 57

  • 1.3k
  • 345

अध्याय 57 लवणासुराचे आख्यान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामचंद्र राजीवनयन । कथा सांगतां लक्ष्मणा ।थोर आश्चर्य पावला मना । ब्रह्मानंदें डुल्लत ॥१॥आधींच कथा रामायणी । जे कां वदला वाल्मीक मुनी ।सुरस आणि जगतारिणी । प्रवेशतां श्रवणीं भवदोष खंडी ॥२॥ऐसे श्रीरामलक्ष्मण । चर्चा करितां निशी क्रमोन ।प्रभात होय रविकिरण । सर्वत्र अवनीं प्रगटले ॥३॥दोघे बंधु श्रीरामलक्ष्मण । करोनियां संध्यास्नान ।भद्रासनीं येवोनि जाण । राजनीती करिते झाले ॥४॥ ऋषिसमुदाय श्रीरामांच्या दर्शनार्थ आला : तंव सुमंत प्रधान आला । श्रीरामा नमस्कार केला ।म्हणे स्वामी ऋषींचा मेळा । द्वारी उभा दर्शनार्थी ॥५॥यमुनातीरींचें ऋषीश्वर । भर्गवच्यवनादि थोर थोर ।तुमचे भेटीलागीं द्वार । धरोनि उभे असतीं