रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 62

  • 2.5k
  • 750

अध्याय 62 अगस्ति – श्रीराम संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कुंभोद्भव म्हणे जामदग्नजेत्यासी । पूर्वी त्रेतायुगाची कथा ऐसी ।जे वर्तली ते तुजपासीं । विस्तारेंसीं सांगेन ॥१॥पूर्वी त्रेतायुगामाझारीं । शतयोजनें वनविस्तारीं ।पशु पक्षी नाहीं त्या वनांतरीं । त्यजोनि दुरी गेले मानव ॥२॥तया वनाभीतरीं । एक तापस उत्तम तप करी ।मीही रामा हिंडत तेथवरी । तया वना प्रवेशलों ॥३॥फळें मुळें सुस्वादिष्ट । भक्षितां प्राणी होय संतुष्ट ।मार्गीं रमलियाचे कष्ट । तया वनीं निवारती ॥४॥अनेक वृक्ष बहुत जातींचे जाण । तयांचे कोण करील वर्णन ।तयांमध्ये एक सरोवर विस्तीर्ण । एकयोजनपर्यंत ॥५॥तया सरोवराभीतरीं । नानापरींच्या कमळिणी भ्रमरी ।रुणझुण करिती नाना स्वरीं । मंजुळ शब्देंकरोनी