रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 68

  • 2.6k
  • 762

अध्याय 68 लक्ष्मण-हनुमंताला पकडून नेले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ उरलेल्या सैन्याने रामांना वृत्तांत सांगितला : गतप्रसंगीं अनुसंधान । ऐसें असे निरुपण ।भरत शत्रुघ्नासी बांधोन । कुशें जाण युद्ध केलें ॥१॥उरल्या सैन्या करोनि मार । विजयी दोघे राजकुमर ।भरतशत्रुघ्न बांधोनि वीर । अश्वापासीं राखिलें ॥२॥येरीकडे रणीं पडिले । ते सावध होवोनि बैसले ।मागें पुढें पाहात ठेले । तंव कोणी नाहीं युद्ध करित ॥३॥ऐसें देखोनि घायाळ वीरीं । कण्हत कुंथत साकेतपुरीं ।प्रवेशतां मार्गीं एके पुरीं । करिती गजरीं महाशब्द ॥४॥एकांचें फुटलें शिर । एकांचे उखळले कर ।एक सर्वांगें जर्जर । एक अशुद्धें डवरिले ॥५॥एक रडत पडत । एक कटिभंगें येती लोळत ।एकांची