रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 71

  • 2.5k
  • 804

अध्याय 71 मूळकासुराला लंकेची प्राप्ती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वज्रसारेकडून मूळकासुराचा धिःकार : येरीकडे अनुसंधान । रम्य रामायण पावन ।श्रवणें भवदोषखंडण । श्रवणमात्र केलिया ॥१॥कैकेयीनें प्रबोधोनि कुंभकर्णपत्नीतें । आपण गेली अयोध्येतें ।मागें वर्तलें तें सावचित्तें । श्रोतृजनीं अवधारिजे ॥२॥वज्रसारानामें कुंभकर्णजाया । निखंदोनि बोले निजतनया ।म्हणे पुत्रा तुझा जन्म वायां । भूमिभार झालासी ॥३॥मूळीं लागोनि सर्व शांती । केली आपुल्या पित्याचे संपत्ती ।अभाग्यें उरलासि क्षितीं । आम्हां दुःख दावावया ॥४॥जरी जन्मलासी पाषाण । तरी सार्थक होतें जाण ।तुज विवोनि वंध्यापण । माझें न चुके पापिष्ठा ॥५॥जाय शिरीं घालीं पर्वत । नातरी करीं पर्वतपात ।विष भक्षोनि प्राण निश्चित । सोडोनि देई पापिष्ठा