रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 72

  • 1.2k
  • 273

अध्याय 72 मूळकासुराचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामभेटीला बिभीषण निघाला, अयोध्येचे वर्णन : रणीं बिभीषण पडिला । तो प्रधानें सावध केला ।जैसा नदीस बुडतां काढिला । थडीचिया जनीं हो ॥१॥रावणानुज होवोनि सावधान । प्रधानांप्रति बोले वचन ।आतां कर्तव्य काय आपण । इये समयीं करावें ॥२॥प्रधान म्हणती राजाधिराजा । शरण जावें श्रीरघुराजा ।सिंहाचे प्रसादें अजा । गजमस्तकीं आरुढली ॥३॥गदापाणि म्हणे धन्य जिणें । आजि राघवासि भेटणें ।हाचि निश्चय करोनी मनें । प्रधानांसीं निघाला ॥४॥चवघांचिया समवेत । बिभीषण मार्गी जात ।म्हणे आजि भेटेल गरुडध्वज । क्षेम देईल उचलोनि भुज ।सांगेन जीवींचें निजगुण । अधोक्षज देखिलिया ॥६॥नेत्रां होईल पारणें । धणीवरी सुख