तो एका टेबल वर बसून तिची वाट बघत होता. त्याने पुन्हा घड्याळाकडे बघितले, वेळ थांबला तर नाही असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याने पुन्हा खिडकीच्या बाहेर बघितले. त्या कोफी हाऊस समोरून अनेक व्यक्ति पसार होत होते आणी तो प्रत्येक चेहऱ्याकडे निरखून बघत होता. काही व्यक्ति कोफी हाऊस मध्ये प्रवेश करून आपल्या आवडीच्या पदार्थाचा आस्वाद घेऊन तृप्त झाल्यानंतर पुढे जात होते. वेइटर पुन्हा त्याच्या समोर येऊन थबकला आणी त्याने त्याच्या चेहऱ्याकडे न बघताच हाताने इशारा केला. त्या वेइटरने काउंटरवर बसलेल्या मॅनेजर समोर बघितले. मॅनेजरने नवीन आलेल्या व्यक्तिला बघ असा इशारा केला आणी वेइटर त्या नवीन व्यक्ति जवळ गेला. आलेल्या व्यक्तिने