सातव्या मजल्यावरील रहस्य - भाग 2

  • 7.9k
  • 1
  • 5.3k

"काही लिंक लागतेय का राघव? तू तन्मय ची डेडबॉडी तपासली का?", इन्स्पेक्टर नाईक "हो सर मी अगदी बारकाईने निरीक्षण केलं. तन्मय पाठीवर पडला आहे. त्याचे डोके बिल्डिंग कडे आणि पाय रस्त्याकडे आहेत. तो ज्या अवस्थेत पडला आहे त्यावरून दोन शक्यता आहेत. एक तर दारूच्या नशेत असल्याने तोल जाऊन तो खाली पडला किंवा त्याला कोणीतरी ढकललं. आणखी एक गोष्ट मला कळली ती म्हणजे हा लांब केस जो तन्मय च्या शर्टवर मला दिसला तो मी ह्या प्लास्टिक च्या पिशवीत ठेवला आणि तन्मय चा शर्ट मागच्या बाजूने थोडा फाटला आहे. माझ्या मते खाली पडताना त्याचा शर्ट कशाला तरी अडकला असावा",मी "तो केस कोणाचा