Saatvya majlyavaril Rahashy - 2 books and stories free download online pdf in Marathi

सातव्या मजल्यावरील रहस्य - भाग 2

"काही लिंक लागतेय का राघव? तू तन्मय ची डेडबॉडी तपासली का?", इन्स्पेक्टर नाईक

"हो सर मी अगदी बारकाईने निरीक्षण केलं. तन्मय पाठीवर पडला आहे. त्याचे डोके बिल्डिंग कडे आणि पाय रस्त्याकडे आहेत. तो ज्या अवस्थेत पडला आहे त्यावरून दोन शक्यता आहेत. एक तर दारूच्या नशेत असल्याने तोल जाऊन तो खाली पडला किंवा त्याला कोणीतरी ढकललं. आणखी एक गोष्ट मला कळली ती म्हणजे हा लांब केस जो तन्मय च्या शर्टवर मला दिसला तो मी ह्या प्लास्टिक च्या पिशवीत ठेवला आणि तन्मय चा शर्ट मागच्या बाजूने थोडा फाटला आहे. माझ्या मते खाली पडताना त्याचा शर्ट कशाला तरी अडकला असावा",मी

"तो केस कोणाचा असावा असे वाटते तुला?",इन्स्पेक्टर नाईक

"राजेश च्या बोलण्यावरून कळलं की तन्मय चे त्याच्या गर्लफ्रेंड शी फोनवर वाद झाले. त्यावरून असे वाटते की हा केस त्याच्या गर्लफ्रेंड चा असावा. ",मी

"म्हणजे त्याच्या गर्ल फ्रेंड ने त्याला ढकललं असं तुला वाटते का?",इन्स्पेक्टर नाईक

" तसंच काही सध्या म्हणता येणार नाही त्यासाठी मला काही गोष्टी तपासून बघाव्या लागतील. आणि त्याच्या शर्टाचा तुकडा बाल्कनीत अडकला की टेरेसवर हे मला बघावं लागेल त्यावरूनच तो बाल्कनीतून पडला की टेरेसवरून पडला हे समजेल.",मी

"ठीक आहे तू तुझं चालू दे काही क्लू लागला तर मला सांग",इन्स्पेक्टर नाईक

"हो सर नक्की",मी

मी बाल्कनी तपासली त्यात कुठेही शर्टाचा तुकडा दिसला नाही. त्यानंतर मी तन्मय जिथून पडला त्या जागेवर टेरेसवर पोचलो.तिथे त्याच्या शर्ट चा तुकडा एका भिंतीला अडकलेला मला दिसला. तिथे खाली फरशीवर magnifying ग्लास ने निरीक्षण केल्यावर मला दोन प्रकारच्या बुटांचे ठसे दिसले. त्यापैकी एका बुटांचे ठसे हे तन्मय चेच होते परंतु दुसरे ठसे कोणाचे असावे हे शोधणं आवश्यक होतं. ते दोन ठसे अश्या प्रकारचे होते जसे दोन व्यक्ती रांगेत उभ्या असाव्यात. म्हणजेच कोणीतरी तन्मय ला मागून धक्का देऊन मारलं असावं. तसेच दुसऱ्या ठशांवर लाल माती होती म्हणजेच खूनीचे शूज लाल मातीने भरलेले असावेत. लाल मातीने भरलेले शूज चे ठसे पुसट होत होत खाली तन्मय च्या फ्लॅट च्या दिशेने जाताना दिसत होते.

इन्स्पेक्टर नाईकांना ह्याबद्दल मी सांगितलं. एव्हाना तन्मय च्या गर्लफ्रेंड ला बोलावण्यात आलं.
तिला खूप मोठा धक्का बसला. समोरचे दृश्य बघून तिचे अश्रू थांबत नव्हते.

"तन्मय कसा काय पडला? काल रात्रीच आमचं बोलणं झालं होतं फोनवर,तेव्हा तर तो ओके होता मग अचानक काय घडलं की त्याने सुसाईड केलं. सांगा मला कोणीतरी",तन्मय ची गर्लफ्रेंड रक्षा म्हणाली.

"सर्वात आधी तुम्ही शांत व्हा मॅडम. मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला",मी

"मला थोडं पाणी मिळेल का?",

"हे घ्या मॅडम पाणी पिऊन घ्या आणि सविस्तर पणे माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या",मी

"हो मला जेही माहीत असेल त्याचे उत्तरं मी देईन",रक्षा

"तुम्हाला आता बरं वाटतेय का?",मी

"हो तुम्ही विचारा प्रश्न",रक्षा

"मला सांगा की शेवटी तुम्ही तन्मय ला केव्हा भेटलात?",मी

"आम्ही काल दुपारीच भेटलो. तेव्हा त्याचा मूड चांगला होता",रक्षा

"रात्री तुमचा त्यांच्याशी काही वाद झाला होता का?",मी

"नाही वाद असा काही झाला नव्हता",रक्षा

"तुम्ही खरं बोलता आहात असे मी गृहीत धरतो",मी

"हो मी खरं तेच सांगतेय",रक्षा

"ठीक आहे. मला तुमचे शूज बघायचे आहेत.",मी

"माझे शूज? ते का बरं? तुमचा अजूनही माझ्यावरच संशय आहे का?",रक्षा

"कसं असते मॅडम जोपर्यंत खरा गुन्हेगार मिळत नाही तोपर्यंत सगळ्यांवरच संशय असतो. शूज तपासणे हा चौकशीचा भाग आहे त्यात तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे.",मी

"ते ठीक आहे पण इतरांचे शूज सुद्धा तुम्ही तपासा",रक्षा

"सगळ्यांचे शूज तपासून झाले आहेत. आता फक्त तुमचेच शूज तपासायचे राहिले आहेत",मी मुद्दामच खोटं सांगितलं.

"ठीक आहे मला शूज दाखवायला काहीच प्रॉब्लेम नाही. कर नाही त्याला डर कशाला? हे बघा शूज",रक्षा

मी रक्षाचे शूज बघितले पण ते मी बघितलेल्या ठशांशी जुळत नव्हते. मी तिला जायला सांगितलं. जाण्या आधी ती मला म्हणाली,"राघव सर काही करून माझ्या तन्मय च्या मारेकऱ्याला शोधून काढा."

"काळजी करू नका गुन्हेगार लवकरच सगळ्यांच्या समोर येईल",मी

मी अर्पित,राजेश आणि विजय तिघांचेही शूज बघितले पण ते त्या ठशांशी जुळत नव्हते. नेमके कोणी तन्मय ला ढकलले हे कळत नव्हतं.

सॉरी. मी अशीच कुंडी परत आणून ठेवेन.",मी

"तशीच कुंडी आणणे तुम्हाला जमणार नाही सर",अर्पित

"का?",मी

क्रमशः


इतर रसदार पर्याय