Saatvya majlyavaril Rahashy - Last part books and stories free download online pdf in Marathi

सातव्या मजल्यावरील रहस्य - अंतिम भाग

"कारण ते कॅक्ट्स चं रोप फार दुर्मिळ होतं. विजय ने खूप शोध घेऊन ते रोप आणलं होतं",अर्पित

"अच्छा असं आहे का! विजय तू कुठून आणलं हे रोप?",मी

"मी नाही हो सर, आमचा दुसरा एक मित्र आहे त्याचेही नाव विजयच आहे.",विजय

"अरे! असं आहे का! मग तो विजय का नाही आला पार्टी ला तुमच्यासोबत?",मी

"त्याची तब्येत बरी नाहीये",राजेश

"कुठे राहतो तो?",मी

"तो इथून 2 किलोमिटर वर राहतो. तिथे त्याचा बंगला आहे.",अर्पित

"मग असं करायचं का, आपण त्याला भेटायला जायचं का? म्हणजे मला त्याला कुंडी बद्दल विचारता येईल आणि तो आजारी असल्याने तुमचीही त्याच्याशी भेट होईल.",मी

"हो चालेल आम्हालाही त्याला भेटायला जायचच होतं पण तुम्ही थांबवून घेतलं म्हणून आम्ही थांबलो होतो.",राजेश

आम्ही चौघेही विजयच्या बंगल्या कडे निघालो. इन्स्पेक्टर नाईकांना सांगून च मी निघालो. विजय च्य अंगणात सगळीकडे वेगवेगळे रोप लावलेले होते.
आम्ही विजयच्या दाराची बेल वाजवली. नोकराने दार उघडलं.

"कोण पाहिजे आपल्याला? सरांची तब्येत बरी नाही ते झोपले आहेत.",नोकर

"काही हरकत नाही ते उठेपर्यंत आम्ही थांबतो. विजय,अर्पित आणि राजेश तुम्ही बसा मी एक महत्त्वाचा कॉल करून येतो",असे म्हणून मी बंगल्याच्या बाहेर आलो.

बाहेर आल्यावर एक गोष्ट मी पडताळून घेतली आणि एक फोन केला आणि मी हॉल मध्ये सोफ्यावर जाऊन बसलो.

थोड्यावेळाने आतून विजयचा आवाज आला,"कोण आहे रे सदू?"

"साहेब तुम्हाला भेटायला तुमचे मित्रं आले आहेत.",सदू

"पाठवून दे त्यांना आत",विजय

आम्ही सगळे आत गेलो. विजय बेडवर तक्क्याला टेकून बसला होता.

"अरे या या! हे कोण गृहस्थ?",माझ्याकडे अंगुलीनिर्देश करत विजय 2 म्हणाला.

"मी गुप्तहेर राघव! तुमचा मित्र तन्मय ह्या जगात आता नाही हे तुम्हाला माहीत नाही का?",मी

"क्काय!!! कसं काय? हे केव्हा घडलं? मला कोणी काहीच सांगितलं नाही.",तिन्ही मित्रांकडे बघत विजय(2) म्हणाला.

"तुला बरं नव्हतं म्हणून आम्ही मुद्दामच तुला सांगितलं नाही",अर्पित

"आम्हाला ही आज सकाळीच कळलं. आम्ही अजूनही त्या धक्क्यात आहोत",राजेश

"मला कोणी सविस्तर सांगेल का?",विजय 2 म्हणाला.

त्यावर तिन्ही मित्रांनी त्याला सगळं सविस्तर कथन केलं.

"बापरे! I am shocked!!", विजय 2 म्हणाला.

"हे तर काहीच नाही तुम्हाला अजून एक शॉक बसणार आहे पण त्याआधी मला तुम्ही तन्मय ला दिलेलं निवडुंगाचे रोप कुठून आणले ते सांगाल का?",मी

"अहो ते मी केरळ वरून आणले होते. खूप दुर्मिळ रोप आहे ते. पण त्याबद्दल आपण का विचारता आहात?",विजय 2

"अरे माझा चुकून त्या कुण्डीला धक्का लागून ती पडली. मला त्याजागी तसेच रोप आणून ठेवायचं होतं म्हणून मी विचारलं",मी

"अच्छा !अच्छा! बरं आत्ता तुम्ही मला आणखी एक शॉक बसण्याबद्दल बोलले त्याचं काय?",विजय 2

"हो हो सांगतो न, घाई काय आहे?",मी

सगळेजण प्रश्नार्थक नजरेने एकमेकांमध्ये बघू लागले.

"ते बघा आलेच इन्स्पेक्टर नाईक",मी

"इन्स्पेक्टर? ते कशाला आलेत?",विजय 2

"अरे तुला अटक करायला",मी हसत उत्तर दिलं.

"विजय you are under arrest",इन्स्पेक्टर नाईक

विजय 2 खडबडून उठला.
"मला का अटक? मी काय केलंय?",विजय 2

"ठीक आहे, तुला आता पूर्ण स्टोरी सांगतो.

काल रात्री 1 ते दीड दरम्यान तू वॉचमन ला झोपलेलं पाहून तन्मय कडे गेला. त्याला त्याच्या बिल्डिंग च्या टेरेसवर घेऊन गेला. तिथे तुमच्यात काही वाद झाला आणि तू आधीच प्लॅन केल्याप्रमाणे त्याला पाठमोरा असताना टेरेस वरून ढकलून दिलं.",मी

"मी कसं काय करेन असं? मी तर माझ्या घरी होतो आणि आजारी आहे मग मी कशाला असं करेन?",विजय 2

"आत्ता मी कॉल करायच्या निमित्ताने बाहेर गेलो होतो तेव्हा शू ऱ्याक वरचे तुझ्या बुटाचे ठसे मी पाहिले आहेत. ते तंतोतंत तन्मय च्या टेरेस वरच्या ठशांशी जुळतात. आधी मला वाटलं तन्मय कडे जमलेल्या मित्रांपैकी एखादा खुनी असेल कारण टेरेस वर जे खून्याच्या बुटांचे ठसे मिळाले ते पुसट होत होत तन्मय च्या फ्लॅट जवळ जात होते पण जेव्हा माझ्याच्याने ती निवडुंगा ची कुंडी फुटली तेव्हा मला कळलं की ती कुंडी तूच तन्मय ला दिली होती.",मी

"हो मी दिली होती पण त्याचा आणि मी खुनी असल्याचा काय संबंध?",विजय 2

"अरे आत्ताच मी सांगितलं न की तुझ्या बुटांचे ठसे तंतोतंत जुळले. इथे आल्यावर मी पाहिले की तुला बागकाम ची फार आवड आहे. सगळीकडे इथे लाल माती आहे. तन्मय ला दिलेल्या कुंडीत सुद्धा अशीच लाल माती होती आणि खुन्याच्या बुटांच्या ठश्यांना सुध्धा अशीच लाल माती लागली होती म्हणून असा निष्कर्ष निघतो की तूच तन्मय चा खुनी आहेस.",मी

"आता बऱ्या बोलाने कबूल कर नाहीतर दाखवावा लागेल तुला पोलिसी खाक्या.", इन्स्पेक्टर नाईक

"एक मिनिट मला बघायचं आहे माझ्या कोणत्या बुटांचे ठसे जुळतात ते",विजय 2 धडपडत उठत म्हणाला.

त्याने बाहेर येऊन लाल मातीत भरलेले त्याचे बूट बघितले आणि त्याने दोन सेकंद काहीतरी विचार केला आणि मला हळू आवाजात काहीतरी सांगितलं ते ऐकून मला धक्का बसला आणि आम्ही पुन्हा हॉल मध्ये गेलो.

इन्स्पेक्टर हळू हळू खून्या जवळ चालत गेले आणि त्यांनी हतकडी पुढे केली तशी ती व्यक्ती ताडकन उठून उभी राहिली.

"सर हे हे तुम्ही काय करताय? माझा काय संबंध ह्याच्यात?"

"बर्या बोलाने कबूल कर अर्पित",मी

" नाहीतर दाखवावी लागेल तुला थर्ड डिग्री ", इन्स्पेक्टर

अर्पित ने थोडावेळ घेतला आणि घसा खाकरून तो सांगू लागला.

"हो मीच त्याला ढकललं. माझ्या बहिणीला साक्षीला तो फसवत होता. ती संपूर्ण त्याच्या आहारी गेली होती. मी तिला आणि तन्मय ला दोघांनाही सर्वतोपरी समजावलं पण ते दोघं ऐकायला तयार नव्हते. जेव्हा माझ्या बहिणीचे अबॉर्शन करण्याची वेळ आली तेव्हा मी ठरवलं की आता तन्मय ला संपवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. म्हणून मी सगळे झोपल्यावर तन्मय ला काहीतरी महत्त्वाचे सांगायच्या निमित्ताने त्याला टेरेसवर बोलावलं आणि तो बेसावध पाठमोरा असताना त्याला ढकलून दिलं. पण तुम्हाला कसा काय माझ्यावर संशय आला? तुम्ही तर विजय 2 ला अटक करणार होते",अर्पित

"पण तू विजय 2 ला का अडकवू पाहत होता",मी

"मी एका दगडात दोन पक्षी मारायच्या प्रयत्नात होतो",अर्पित

"ते कसं काय?",मी

"विजय 2 ची फार जुनी उधारी चुकवायची होती मला.",अर्पित

"ते कसं काय सविस्तर सांग",मी

"ही दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही सगळे एकाच ऑफिसमध्ये काम करतो. खरं तर मला प्रमोशन मिळणार होतं पण काय माहित विजय 2 ने आमच्या लंपट बॉस ला कसं काय गटवल ऐनवेळी प्रमोशन लिस्ट वर माझ्या ऐवजी विजय 2 चे नाव झळकले तेव्हा पासून माझा त्याच्यावर राग होता."

अर्पित चा कबुली जबाब ऐकून तिन्ही मित्रांना धक्का बसला. त्यांनीं त्याला दूषणं दिली पण अर्पित च्या चेहऱ्यावर पश्र्चाताप मुळीच दिसत नव्हता.

"जे काही कारण असो पण तु एक खून केला आहेस त्यामुळे तुला अटक होणारच",मी

"पण आधी तुम्हाला विजय 2 वर संशय होता मग अचानक अर्पित ला का तुम्हाला अटक करावेसे वाटले?",राजेश

"कारण विजय2 चे बुटाचे ठसे जुळत होते पण जेव्हा विजय 2 ने सांगितलं की दोन दिवसांपूर्वी अर्पित विजय 2 कडे आला असता त्याची चप्पल तुटली होती म्हणून त्याने विजय 2चे बूट घालून नेले होते. ते बूट तेच होते ज्यांचे ठसे खुन्याच्या बुटाच्या ठशांशी जुळत होते.",मी

आता सगळ्यांना सगळं व्यवस्थित कळलं होतं.

"चला अर्पित साहेब जेल ची हवा खायला",इन्स्पेक्टर नाईक.
********************************************
इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED