Saatvya majlyavaril Rahashy - 1 books and stories free download online pdf in Marathi

सातव्या मजल्यावरील रहस्य - भाग 1

त्या दिवशी एक जानेवारीला शुक्रवारी आम्ही सगळे फेरफटका मारण्यासाठी घराच्या बाहेर पडलो. अर्ध्या रस्त्यात असताना माझा फोन खणखणला.
"हॅलो राघव"

"हां बोला इन्स्पे नाईक",मी

"तू जिथेही असशील तिथून त्वरित मी पाठवलेल्या पत्त्यावर ये. आल्यावर मी सांगतो सविस्तर.",इंस्पे नाईक

"ठीक आहे सर मी येतो लगेच",मी

"काय झालं? नवीन केस आहे वाटते!", रत्नेश

"हो मला निघायला हवं. तुम्ही सगळे लंच करून घ्या माझी वाट पाहू नका.

"हो हो ते तर ओघाने आलंच ",विघ्नेश

मी त्वरित इन्स्पेक्टर नाईकांनी पाठवलेल्या पत्त्यावर पोचलो.

सप्तसूर नावाच्या एका बिल्डिंग भोवती खूप लोकं जमा झाले होते.
दुरून इन्स्पेक्टर नाईक फोनवर बोलत असताना दिसत होते. मी इन्स्पेकटर नाईकांच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. पोलिसांनी त्याच्या भोवती खडूने आखले होते. आजूबाजूला पाच पन्नास लोकं जमले होते.

"राघव बरं झालं तू लवकर आला. ", इन्स्पेक्टर नाईक

"काय झालं सर? हा माणूस इथे कसा काय पडला?",मी

"तेच सांगतो आता तुला सगळं सविस्तर", इन्स्पेक्टर नाईक

आम्ही थोडं बाजूला राहून बोलू लागलो.

"हा जो खाली पडला आहे त्याचे नाव तन्मय आहे. वय 25 वर्षे. हा आणि ह्याचे तीन मित्र राजेश,विजय,अर्पित हे काल थर्टी फर्स्ट साजरी करायला ह्या बिल्डींग च्या सातव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट नंबर 701मध्ये जमले होते.
रात्री पार्टी ड्रिंक्स वगैरे झाल्यावर हे सगळे तिथेच झोपले आणि आज सकाळी साधारण सहा साडे सहा वाजता वॉचमन च्यां आवाजाने ह्यांना जाग आली. तिघे जेव्हा खाली आले तेव्हा त्यांना तन्मय असा मरून पडलेला दिसला. त्यांनी लगेच आम्हाला कळवलं. बॉडी आता पोस्ट मार्टम ला पाठविण्यात येईल. त्यानंतर आपल्याला कळेल की नेमका तन्मय केव्हा खाली पडला.", इन्सपे. नाईक

"ओके पण फ्लॅट 701कोणाचा आहे? तन्मय चा आहे का?",मी

"हो", इं. नाईक

"नेमका तन्मय कुठून पडला असावा? त्याच्या बेडरूम च्या बाल्कनीतून की बिल्डिंग च्या टेरेसवरून?",मी

"काही कळत नाही", ईंस. नाईक

"सगळ्यांच्या साक्ष घेऊन झाल्या का?",मी

"नाही म्हणूनच तर तुला बोलावलं. तुला काही विचारायचे असेल तर तेव्हाच विचारून घेता येईल.", इंसपे. नाईक

इन्स्पेक्टर नाईकांनी विजय ला जबानीसाठी बोलावले.

"नाव,वय,पत्ता काय?",मी

"विजय माझं नाव,मी 22 वर्षांचा आहे. इथून दोन घरं सोडले की माझं घर येईल.",विजय

"नेमकं काल काय झालं ते सविस्तर सांग",मी

"मी,अर्पित,राजेश आणि तन्मय आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो. ऑफिस झाल्यावर आम्ही थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करायला तन्मय कडे जमलो.",विजय

"साधारण किती वाजता?",मी

"सात वाजता",विजय

"ठीक आहे पुढे सांग",मी

"जमल्यावर आम्ही काही वेळ गप्पा केल्या त्यानंतर ड्रिंक्स मग जेवण आणि त्यानंतर आम्ही झोपून गेलो. वॉचमन ने जेव्हा दार ठोठावले तेव्हा आम्ही उठलो आणि बाहेर आलो. बाहेरचे चित्र पाहून तर आम्हा सगळ्यांना शॉक च बसला.",विजय

"रात्री तुमच्यात काही वाद भांडण झाले होते का?",मी

"नाही. भांडण करण्याचा प्रश्नच कुठे येतो? आम्ही सगळे आनंदात होतो.",विजय

"तन्मय टेन्शन मध्ये आहे असं तुम्हाला वाटलं का?",मी

"नाही तसं काही वाटलं नाही. तो अगदी फ्रेश मूड मध्ये होता.",विजय

"साधारण तुम्ही किती वाजता झोपले",मी

"आम्ही साधारण 12 साडे बारा ला झोपलो असू",विजय

"रात्री तुम्हाला कोणाला जाग आली होती का?",मी

"मी तर साडे बारा ला झोपलो तर एकदम सकाळी वॉचमन च्या आवाजानेच उठलो. इतरांचे मला माहिती नाही.",विजय

"ठीक आहे आता तू जा आणि अर्पित ला पाठव चौकशी साठी. कधीही काम पडलं तर तुला पोलीस स्टेशन ला यावे लागेल हे लक्षात असु दे.",मी

"हो हो नक्की मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करेन",विजय

"ये अर्पित. मी तुला काही प्रश्न विचारणार आहे त्याचे सगळे खरे उत्तर तू देशील अशी अपेक्षा आहे",मी

"हो सर मी तुम्हाला मला जे माहिती आहे ते सगळं सांगेन.",अर्पित

अर्पित ने सुद्धा विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली. विजय ने जे सांगितलं तेच अर्पित ने सांगितलं.

त्यानंतर इन्स्पेक्टर नाईकांनी राजेश ला चौकशी साठी बोलावले.

"बोल राजेश काल काय काय घडलं,तुम्ही कोण कोण जण इथे होते?",मी

"आम्ही चौघे जण संध्याकाळी जमलो, ड्रिंक्स जेवण गप्पा यामध्ये वेळ कसा निघून गेला आम्हाला कळलं सुध्धा नाही. साधारण बारा साडे बाराला आम्ही झोपून गेलो आणि नंतर वॉचमन च्याच आवाजाने आम्ही जागे झालो.",राजेश

"तूम्हा चौघांव्यातिरिक्त कोणी आणखी तुमच्या पार्टीला उपस्थित होतं का?",मी

"नाही आम्ही चौघेच होतो",राजेश

"तन्मय अपसेट होता असं तुला जाणवलं का?",मी

"नाही तसं काही मला वाटलं नाही पण त्याला एक फोन आला तेव्हा तो थोडा चिडला होता. बहुतेक त्याच्या गर्लफ्रेंड चा कॉल होता.",राजेश

"त्याच्या गर्लफ्रेंडच आणि त्याचं काही बिनसलं होतं का?",मी

"काही कल्पना नाही",राजेश

"ठीक आहे राजेश तू जा आता. काही काम पडलं तर तुला बोलावून घेऊ",मी

"ओके राघव सर",राजेश
क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED