एक पडका वाडा - भाग 2

  • 8.3k
  • 5.2k

हळूहळू रक्षा शुद्धीवर आली. "रक्षा काय झालं तुला? ही तुझी अवस्था हे ओरखडे कसे आले? त्या खोलीत कोण आहे?",मी असं म्हणताच भीतीने तिचे डोळे पांढरे झाले. "नेहा हे सगळं खूप भयानक आहे. आपण खूप मोठ्या संकटात सापडलोय. ह्या वाड्यात अघोरी शक्ती आहे. मी गिल्ली घ्यायला पुढे गेली तेव्हा कोणीतरी त्या खोलीत मला ओढून नेल्यासारखं वाटलं. मी आत जाताच माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. दार बंद व्हायचा जोरात आवाज झाला आणि मला खोलीत पाच मोठमोठे वटवाघूळ खोलीच्या चार कोपऱ्यात चार आणि छतावर एक असे उलटे लटकलेले दिसले ते वटवाघळे साधे नव्हते त्यांचा आकार खूप मोठा होता मानवाच्या आकारा एवढे होते ते त्याचं