एक पडका वाडा - भाग 3

  • 7.6k
  • 4.7k

आमचे पालक एकसारखे धडधड दार ठोठावत होते. आमच्या खोलीचा दरवाजा काही केल्या उघडेना. आम्ही दाराजवळ उभ्या राहून दार उघडण्याची खटपट करत होतो. तेवढ्यात आमच्या खांद्यावर दोन हात पडले आणि मोठ्याने कोणीतरी आमच्या कानात आरोळी मारली. बापरे! केवढी कर्कश्श होती ती आरोळी क्षणभर आमचे कान आणि मेंदू बधिर झाले. आम्ही थरथरत मागे वळून बघितलं आमच्या माना अक्षरशः भीतीने थरथरत होत्या. दात दातांवर आपटत होते. मागे वळून बघताच एक मोठी आरोळी माझ्या तोंडून निघाली. रक्षा ची तर दातखीळच बसली होती. एक सांगाडा आमच्या पुढ्यात उभा होता व त्यानेच त्याचे दोन हात आमच्या खांद्यावर ठेवले होते. त्याच्या डोळ्यांच्या खोबण्या लाल भडक रंगाच्या होत्या.