एक पडका वाडा - भाग 5

  • 6.5k
  • 3.7k

तेवढ्यात रक्षाला एक चौकोनी फरशी दिसली ती मला म्हणाली, "ते बघ नेहा तिकडे त्या फरशीवर चल तिथे एकही साप नाहीये" मी बघितलं खरंच त्या फरशीवर एकही साप नव्हता कारण त्याच्या भोवती काटेरी वनस्पती उगवल्या होत्या. आम्ही कशाबशा काटेरी झुडुपे ओलांडून त्या फरशीवर उभे राहिलो न राहिलो की ती फरशी एखादं झाकण आतल्या बाजूला उघडावे अशीं उघडली आणि आम्ही खाली अंधाऱ्या बोगद्यात पडलो. म्हणजे ती एक आणखी एका गुप्त मार्गाची कळ होती. त्या अंधाऱ्या बोगद्यात वरच्या दिशेने जायला मार्ग होता. पुन्हा ती फरशी घट्ट बंद होऊन गेली होती. आम्हाला वर जाण्याऐवजी दुसरा पर्याय नव्हता. आम्ही सरड्या सारखं सरपटत वर वर जाऊ