एक पडका वाडा - भाग 6

  • 6.5k
  • 3.7k

मला त्यांच्या पंखांचे जोरदार तडाखे बसत होते कितीही चुकवण्याचा प्रयत्न करूनही मी स्वतःला वाचवू शकत नव्हती. मी किंचाळत धावत होती आणि वटवाघळे त्यांच्या पंखांचे फटके मारत होते. आणि तेवढ्यात त्या खोलीचे दार उघडले मी दारात बघितलं आणि अवाक झाली. दारात एक काळ्या कफनीतील व्यक्ती होती लांब जटा गळ्यात कवट्यांची माळ कपाळावर चिता भस्म करडी तीक्ष्ण नजर. क्षणभर एक भीतीची लहर माझ्यामधून गेली. आश्चर्य म्हणजे ते सगळे वटवाघळे आपापल्या कोपऱ्यात जाऊन लटकले. कोण आहे हा माणूस नक्की मांत्रिक असावा म्हणूनच सगळे हे पिशाच्च त्याला टरकून कोपऱ्यात गेले. पण आणलं कोणी यांना बोलावून माझे आईबाबा कुठे आहेत? रक्षाचे आईबाबा कुठे आहेत? सगळ्यात