सवत माझी लाडकी - भाग १

  • 11.7k
  • 4.8k

दारावरची बेल वाजली..तिनं लगबगीनं दरवाजा उघडला. नवऱ्याला असा लवकर आलेला बघून तिला अचंबित व्हायला झालं."काय झालं.. आज लवकर आलात.. तब्येत बरी नाहीये का?"तो काहीही न बोलता बॅग ठेऊन तिथंच सोफ्यावर आडवा होतो.पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देत, "अहो काय झालं.""काही नाही ग.. चक्कर आली आज ऑफिसमधे.. बॉस नी माझी अवस्था बघून टॅक्सी करून घरी जायला सांगितलं. आलो मग.. थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल. तू तुझं आवर . मी झोपतो थोडा वेळ."किचन मध्ये काम करत करत तिचं विचारचक्र सुरू होतं.हल्ली हे बराच उशिरा येतात घरी. घरी आल्यावर देखील अंगात काहीच त्राणचं उरत नाही. आल्यावर फ्रेश होऊन जेवणं झाल्यावर पडल्या पडल्या झोपतात.पुन्हा