गीत रामायणा वरील विवेचन - 11 - आज मी शापमुक्त झाले

  • 3k
  • 1.4k

श्रीराम व लक्ष्मण ऋषि विश्वामित्रांच्या सांगण्यावरून मिथिलेला जायला निघतात. प्रवास सुरु असताना मधून मधून थोडा विश्राम करत. भूक लागल्यावर फळे खात. तहान लागल्यावर प्रवासात लागलेल्या जलाशयातील पाणी पीत त्यांचा मिथिला नगरीकडे प्रवास सूरु होता. प्रवासात जाता जाता त्यांना एक कुटी दिसते व त्यात एक मोठी शिळा दिसते. श्रीराम विश्वामित्रांना त्याबद्दल विचारतात. विश्वामित्र श्रीरामांना त्या शिळेचा इतिहास सांगायला लागतात. हे श्रीरामा, फार वर्षांपूर्वी इथे गौतम ऋषींचा आश्रम होता ते व त्यांची साध्वी पत्नी अहल्या तिथे राहत असत. गौतम ऋषी जसे तपस्वी होते त्याचप्रमाणे त्यांची पत्नी सुद्धा योगिनी होती. एकदा आकाश मार्गाने जात असता इंद्राला गौतम ऋषींचा आश्रम दिसला. आश्रमातील अहल्या देवींना