रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 77 - (अंतिम भाग)

  • 3.7k
  • 1
  • 1.1k

अध्याय 77 श्रीरामांचे सर्वांसह वैकुंठगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अयोध्या सांडोनि अर्ध योजन । पुढें निघाला श्रीरघुनंदन ।देखोनि तीर शरयूचें पावन । तेथें वस्तीसी राहिला ॥१॥त्या शरयूचा महिमा कैसा । जो देवांसी अगम्य सहसा ।जातें वर्णितां महेशा । पार न कळें निर्धारीं ॥२॥मानससरोवरीं जन्मली । उत्तरेची दक्षिणें चालिली ।भागीरथीसी मिळती झालीं । आपुलेनि पूर्वपुण्यें ॥३॥ऐसें शरयूतीर मनोहर । स्नानें निष्पाप होती नर ।तया तीरीं श्रीरघुवीर । प्रस्थानासी उतरला ॥४॥तंव येरीकडे चतुरानन । समस्त देवांसीं परिवारोन ।दिव्य विमानीं सुरगण । आपुल्याला बैसले ॥५॥जैसे हंस आपुल्याला मेळीं । उडोनि बैसती तडागाचे पाळीं ।तैसे देव तये काळीं । परिवारेसीं मिरवले ॥६॥गगनीं विमानांची दाटी