मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३

  • 6.8k
  • 5.3k

मला स्पेस हवी.भाग ३ मागील भागात आपण बघीतलं की सुधीर नेहाला प्रमोशन घेण्यापासून परावृत्त करतो पण नेहा ऐकत नाही पुढे काय होईल बघू. आज नेहाचं ऑफीसमध्ये फार लक्ष लागत नव्हतं बराच वेळेपासून रंजना नेहाचं निरीक्षण करत होती. नेहाला इतकं अस्वस्थ तिने आजपर्यंत कधी बघीतलं नव्हतं. दोघीजणी गेल्या सहा वर्षांपासून चांगल्या मैत्रिणी होत्या. लंचटाईम मध्ये नेहाला विचारू असं मनात म्हणत रंजनाने कामावर लक्ष केंद्रित केलं. लंचटाईम झाला तसं रंजनाने आपलं टेबल आवरलं आणि नेहाच्या टेबलापाशी आली. " नेहा आटोपलं का? लंचटाईम झाला आहे." " हो झालंय. चल." नेहा लंचबाॅक्स घेऊन उठली.दोघी कॅंटीनमध्ये गेल्या. रिकामी जागा बघून दोघी बसल्या . " नेहा