मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३१

  • 3.2k
  • 1.9k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३१मागील भागात आपण बघीतलं की नेहा प्रेग्नंट असते. आपण आता काही वर्ष पुढे जाणार आहोत.नेहाला मुलगा झाला. तो आता अडीच वर्षांचा आहे. प्रियंकाचं लग्न होऊन वर्ष झालं आहे. नुकताच तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा झाला.एके दिवशी रात्री सुधीर, नेहा आणि त्याचे आईबाबा सगळे जेवायला बसलेले असतात. ऋषी मधे मधे काहीतरी बोलत असतो. त्याचं बोबडं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप हसायला येतं असतं. असं सगळं आनंदी वातावरण असतं.तेवढ्यात सुधीरचा फोन वाजतो. फोनच्या स्क्रीनवर निरंजनचं नाव बघून सुधीरला आश्चर्य वाटलं. एवढ्या रात्री दहा वाजता निरंजनने का फोन केला असावा हे कळलं नाही."कोणाचा फोन आहे?"बाबांनी विचारलं."निरंजनचा."सुधीर म्हणाला."एवढ्या रात्री?""तेच